Wednesday, January 19, 2022
Homeक्राईम न्यूजमध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेकडून 7 लाख 15 हजाराच्या गुटख्याच्या साठ्यासह आरोपी गजाआड

मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेकडून 7 लाख 15 हजाराच्या गुटख्याच्या साठ्यासह आरोपी गजाआड

पनवेल ः नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे हद्दीमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला व मानवी जिवीतास हानीकारक असलेला गुटखा व तत्सम पदार्थाची साठवणुक व विक्री करणारे इसमांचे विरूध्द्ध कारवाई करून मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा नवीमुंबईकडून 7 लाख 15 हजाराच्या गुटख्यासह आरोपीला गजाआड करण्यात आले आहे.
याबाबत मा.पोलीस आयुक्त सो. व मा. पोलीस सह आयुक्त सो. नवी मुंबई यांनी आदेशीत केले होते. त्यानुसार नवी मुंबई, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त श्री. प्रविणकुमार पाटीळ, सहायक पोलीस आयुक्त विनोद चव्हाण, यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एन बी. कोल्हटकर, यांनी गुटखा व तत्सम पदार्थाची साठवणुक व विक्री करणारे इसमांचे विरूध्द कारवाई करण्याची मोहीम सुरू केली होती. मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एन.बी कोल्हटकर यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरून मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबईचे अधिकारी ब अंमलदार यांनी रबाळे एमआयडीसी येथील ईशीता हॉटेल, प्लॉट नं. 252, साईनगर, रबाळे येथे छापा टाकुन तेथे अवेद्यरित्या विमळ कंपनीचा गुटखा विक्री करत असतांना इसम नामे केराराम रूपाराम चौधरी, वय 33 वर्षे, व्यवसाय-हॉटेल व किराणा स्टोअर्स, रा. आदिवासी पाडा, साईनगर, रबाळे, नवी मुंबई, मुळ रा. मु. भादरडा, पो. लेदरमेर ता. भिनमाल, जि. जालोर राज्य राजस्थान हा मिळुन आला. त्याचे ईशीता हॉटेलच्या काउंटर व हॉटेलचे गोडावुन मध्ये प्रतिबंधीत विमळ कंपनीचा गुटखा व व्ही-9 तंबाखु असा सुमारे 7,15,000/–रूपये किंमतीचा माळ मिळुन आल्याने त्याचे विरूध्द रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि.नंबर-149/2020, भा.दं.वि.कलम 188, 272, 273, 328, साथीचे रोग अधिनियम कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर इसमास नमुद गुन्हयामध्ये अटक करण्यात आली आहे. सदर इसमाने नमुद गुटखा कोठुन आणला व कोणास विक्री करत होता याचा तपास सुरू आहे.
सध्या चालु असलेल्या कोरोना रोगाच्या महाभयंकर संकटामध्ये नवी मुंबई पोलीस अतिशय व्यस्त असतांनाही वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवा्ड वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी कोल्हटकर, सपोनि निलेश तांबे, ज्ञानेश्‍वर भेदोडकर, सपोउपनिरी संजय पवार, पोह/ पोपट पावरा, प्रदिप कदम, पोना/ सागर हिवाळे, प्रकाश साळुंखे, सतिश चव्हाण, नवनाथ कोळेकर, सचिन धनवटे, विजय पाटील, रूपेश कोळी यांनी उल्लेखनिय कामगिरी केली असुन नमुद गुन्हयाचा पुढील तपास सपोनि. भेदोडकर, मध्यवर्ती कक्ष, गुन्हेशाखा हे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments